Friday, July 10, 2009

माझा पाऊस ...

माझा पाऊस ...

सकाळी सकाळी फ़िरायला जताना,
पाऊस जेव्हा मुजरा करतो,मी
चक्क इंद्रधनुश्य जमीनीवर अवतरतांना बघितलय...

दुपरी चहा पितांना,
पाऊस जेव्हा हेलकावा देऊन जातो...
खोलीत वफ़ेचे ढग जमतांना मी बघितलय...

office मधुन घरी जाताना
जेव्हा पाउस सलामी देतो...
तेव्हा सोन्याचे थेंब पडतांना मी बघितलय...

रात्री थकुन निजताना,
जेव्हा पाऊस कोसळतो...
उशी खाली सुरी घेऊन बरसतांना मी बघितलय..

D shivaनी
Nagpoor

Wednesday, July 8, 2009

मला का कुणी नाही थांबवलं????


पापण्या ह्या ओलावल्या,
मला कुणी नाही कळवलं,
मी संभ्रमात वास्तवाच्या,
मला काहिच नाही जाणवलं.

वेगात चेतवे मन,
अजाण जागी हरवलं,
मी साद घातली नेहमी पण
मला काहिच नाही गवसलं.

मी एक गतीने चालते,
थांबण्याची भीती वाटते,
पण मी चलतच आहे काळ,
मला का कुणी नाही थांबवलं????

D shivaनी
Nagpoor



Sunday, June 14, 2009

जब जब दूर जाते हो.....

जब जब दुर जाते हो,
मै बौखला जाती हु...
झौका वक्त बदलता है,
जिंदगी रुठ जाती है...

बुनाई भी मालुम नही थी,
बस रिश्ता पिरोया था ,
बुनाई खुलने लगती है,
कशीदा तुट जाता है..

आंखो मे नमी होती है,
सासे भी रुठ जाती है.
मंझर ऎसे बदलता के
आसमान भी फ़ुट जाता है.....

जब जब दुर जाते हो
जीदगी रुठ जाती है........

D shivaनी
Nagpoor

येशील???

अमाप करते प्रेम क्तुझ्यावर,
आणि जगुही शक्त नाहि
तुझ्याशिवाय...........
तुला नाही पटत नाही ना....
असते मी गर्दीत नेहमी सगळ्यांसाठी....
पण तुझ्या शिवाय एकटीच रे मी...
जीथे ही जाते तिथे तुझी आठवण...
कधि कधि आठवणि मनात एक सळ
बोचवतात आणि वेदनेची कळ उठते..
कधि कधि एकटेपण जगण्यात खायला
उठते आणि भावना अश्रुंतुन पिते....
पानावर दिमाखानी पाण्याचा मोती
जपावा,तसं तुला जपतेय,
आणि एकटिच आकाशातुन तुझ्या साठी
स्वप्नांचे तारे तोडतेय......
तु येशील माझ्या जीवनात?????
मीळ्तील तुला अमाप स्वप्नांचे मोती,
प्रेमाची पाती,भावनेच्या बाती...
सुंदर नाती......
येशील????
अमाप करते प्रेम क्तुझ्यावर,
आणि जगुही शक्त नाहि
तुझ्याशिवाय...........


D shivaनी
Nagpoor

कधी तरी तर....

कधी तर थांबयला हवा आ
आंधळ्या कोशींबीरिचा खेळ...
मी गवसणी घालते,
आणि तुझे ते नेहमीचेच
हेलकावणीचे मेळ...
तु नाही कधिचाच म्हंणालास,
मी पण accept केलय...
पण शेवटी प्रेअयसीच मन ना माझं,
दर पावसाळ्यात,चातकाची तहान
घेऊन मी उभीच असते तुझ्याच प्रतिक्षेत........

D shivaनी
Nagpoor

Tuesday, June 2, 2009

Restlesness

आज मी अश्रुंसोबत स्वप्नं पण 
वाहुन टाकील म्हणतेय.
पण जमतच नाहिये...
अपुर्ण साला अपुर्णच राहिलं,
पुर्ण तर सोडा पण आठवणींचे
घाव मिटत नाहीये...
भावंनानी एक धरण बांधलय मनात,
एकही दार उघडत नाहीये....
मनसोक्त रडायचं एकदा,
माझा भार सोसेल असा
खांदा मिळतच नाहीये...
आपसुक एखादा ओहोळ वाहतो,
पण तो पण वेदनेची
धगधग शांत करत नाहिये...
आज मी अश्रुंसोबत स्वप्नं पण
वाहुन टाकील म्हणतेय,
पण जमत नाहिये... 

D shivaनी
Nagpoor

Thursday, May 28, 2009

Between the lines...

त्यानी माझा हाथ धरला,शेवटचा...
म्हणाला,तु इतकी चांगली आहेस,
कि तुला को्णीही मिळु शकतो...
मी स्तब्ध,त्याच्या थेट डोळ्यात बघत होती,शेवटचं...
तु सांग कसा मुलगा हवा तुला???
मी शोधतो तुझ्यासाठी,लगेच...
वचता येतं रे मला between the lines
जेव्हा तु म्हणतोस मी शोधतो,
तुझी तिचासाठी असलेली प्रीत लपवत...

Dshivaनी
Nagpoor